समतेचा मंत्र जागवणारा सोहळा: संत रविदास महाराजांची ६४८ वी जयंती धारावीत ऐतिहासिक उत्साहात साजरी
मुंबई प्रतिनिधी : धारावी, मुंबई – समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४८ व्या जयंतीनिमित्त गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ, मुंबई/धारावी विभागाच्या वतीने एक अभूतपूर्व सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याने समाजातील विषमतेच्या भिंती ओलांडून ऐक्याचा नवा अध्याय लिहिला. धारावी सायन स्टेशन समोरील संत रविदास महाराज स्मारक (शिल्पास) येथे …