प्रतिनिधी मुंबई:
संघटनेच्या यशाचा आनंद – समाजसेवेचा नवा सोपान
गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. दिपक सिताराम खोपकर यांना समाजसेवा पुरस्कार आणि संघटनेचे कार्याध्यक्ष मा. श्री. विलासजी धस यांना शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संत रविदास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार ग्राहक संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष आणि मा. कॅबिनेट मंत्री श्री. सूर्यकांत गवळी साहेब व प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री. गजानन भाऊ लिंबोरे यांच्या हस्ते उल्हासनगर येथे प्रदान करण्यात आला.
हा गौरव म्हणजे केवळ दोन व्यक्तींना मिळालेला पुरस्कार नसून, तो संपूर्ण संघटनेच्या अथक परिश्रमांचा आणि समाजहितासाठी केलेल्या समर्पित कार्याचा सन्मान आहे. गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघाने सातत्याने सामाजिक विकास,न्याय, शिक्षण, आणि गरजूंसाठी सेवा हाच ध्येयविषयक मार्ग स्वीकारला आहे. या पुरस्कारांमुळे संघटनेला नव्या उर्जेची आणि प्रेरणेची दिशा मिळाली आहे.
संघटनेच्या प्रत्येक सदस्यासाठी हा गौरव अभिमानास्पद असून, यामुळे संघटनेच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल. मा. श्री. दिपक खोपकर आणि मा. श्री. विलास धस यांनी आपले कार्य असेच अविरत सुरू ठेवावे, अधिकाधिक समाजसेवा घडावी, आणि संत रविदास महाराज यांच्या विचारांचा प्रकाश सर्वदूर पसरावा, हीच प्रार्थना!