मुंबई प्रतिनिधी :



धारावी, मुंबई – समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४८ व्या जयंतीनिमित्त गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ, मुंबई/धारावी विभागाच्या वतीने एक अभूतपूर्व सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याने समाजातील विषमतेच्या भिंती ओलांडून ऐक्याचा नवा अध्याय लिहिला.
धारावी सायन स्टेशन समोरील संत रविदास महाराज स्मारक (शिल्पास) येथे झालेल्या या कार्यक्रमात धारावीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. राजुजी बिडकर यांच्या हस्ते संत रविदास महाराजांना भव्य पुष्पहार अर्पण करण्यात आला. विनम्रता आणि समतेचा महामंत्र जपत संत रविदास महाराजांना अभिवादन करण्यात आले.
मुंबई महानगरपालिका जी उत्तर विभागाचे सहाय्यक अभियंता मा. श्री. निंबाळकर, सहाय्यक अभियंता मा. श्री. बांगर, दुय्यम अभियंता मा. श्री. समीर धामणस्कर, तसेच पर्यवेक्षक श्री. गीते आणि श्री. तायडे यांचीही विशेष उपस्थिती होती. त्यांच्या सहकार्याने कार्यक्रम अधिक भव्य आणि यशस्वी झाला.
समाजाच्या आरोग्याची काळजी आणि सेवा हाच खरा धर्म या विचारांनी प्रेरित होऊन मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन सायन रेल्वे स्टेशनवर करण्यात आले. मा. डॉ. दिपाली मानकर आणि त्यांच्या समर्पित टीमने समाजबांधवांची आरोग्य तपासणी केली. या शिबिरातून आरोग्य जागरूकता आणि सेवा भावनेचे दर्शन घडले.
या ऐतिहासिक सोहळ्याचे अध्यक्षस्थान गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघाचे संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष मा. श्री. दिपक सिताराम खोपकर यांनी भूषवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने समता, न्याय आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असलेला हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
या प्रसंगी संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते:
• प्रांत महिला अध्यक्षा: सौ. मनीषा ताई ठवाळ
• उपाध्यक्ष: सुनील नेटके
• प्रसिद्धी प्रमुख: सचिन खरात
• युवक अध्यक्ष: अजित बागडे
• मुंबई कार्याध्यक्ष: सुधाकर कांबळे
• मुंबई अध्यक्षा: मंगला शिर्के
• मुंबई उपाध्यक्षा: मनीषा ताई मानकर
• धारावी अध्यक्ष: किरण माने
• धारावी उपाध्यक्ष: सचिन सोनावणे, संजय वर्पे
• धारावी संघटक: हिरा नवसूपे
• धारावी महिला अध्यक्षा: पूजा सोनावणे
• धारावी उपाध्यक्षा: मनीषा वर्पे, अश्विनी खरात
• धारावी संघटिका: लक्ष्मी ताई डोईफोडे
• सहसंघटिका: संगीता खाडे, भारती खाडे
• कुर्ला तालुका महिला अध्यक्षा: मीनाताई कापडेकर
• मा. सौ. रुपाली ताई टिके, वर्षा ताई काळे
• धारावी कार्याध्यक्ष: सुभाष डोईफोडे
• मा. श्री. उमेश ठवाल, राजेश साळे, मंगेश मानकर
• पनवेल उपाध्यक्ष: अंकुश काळे
• सामाजिक कार्यकर्ते: बाळासाहेब वर्पे, तन्मय सावर्डेकर, शांताराम दळवी, संतोष कारंडे, संपत कांबळे
या सोहळ्यातील प्रत्येकाचे योगदान समाजातील समतेचे बीज रुजवणारे ठरले. विविध स्तरातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची प्रतिष्ठा उंचावली.
गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघाने घेतलेली ही सामाजिक बांधिलकी समतेच्या विचारांचे प्रेरणास्त्रोत बनली आहे. विषमतेच्या विरोधात लढा देत, समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठीचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला.
या सोहळ्याने धारावीतील संत रविदास मार्गाला पुन्हा एकदा जागरुकतेचे, समतेचे आणि सन्मानाचे प्रतीक बनवले आहे. समाजातील सर्व स्तरांतून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
गुरु रविदास महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन, संघटनेने समतेच्या संदेशाची ज्योत प्रज्वलित केली आहे. एकतेचा महामंत्र, समतेची शिकवण आणि न्यायासाठीचा संघर्ष हे तत्वज्ञान या सोहळ्यातून अनुभवता आले.
संत रविदास महाराजांच्या विचारांचे वचन घेऊन, गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ समतेचा लढा अधिक जोमाने पुढे नेईल, यात शंका नाही.
स्वाभिमानी संघाचा विजय असो !! विजय असो !!