मुंबई प्रतिनिधी : रोहित शिंदे
दि. १८-०३-२०२५ रोजी रात्रीच्या वेळी गणेश म्हात्रे व त्याच कुटूंब त्यांच्या आशिर्वाद निवास पाटणोली येथे घरी झोपले असताना रात्रीच्या ११.४५ सुमारास २ अज्ञात व्यक्ती दुचाकी घेऊन आले आणि ज्वलनशील पदार्थ कुंपणाच्या वरती टाकून कुंपणाला आग लावून दुचाकी वर बसुन पाटणोली गावच्या दिशेने पळून गेले, सदर प्रकार CCTV camera मध्ये रेकॉर्ड झाला आहे. गणेश म्हात्रे व त्याच्या कुटूंबाला जाग आली त्यामुळे त्याना आग लागले हे समजले त्यामुळे त्यांनी लगेच तत्परतेने पाणी टाकुन आग वीजवली त्यामुळे जिवीतहानी झाली नाही परंतु कुंपणाचा नुकसान झाले.
आरटीआय ह्यूमन राईट्स रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राकेश म्हात्रे यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन पोलीस सदर प्रकरणाचा तपास करत असून अस कृत करण्याऱ्या आरोपींना लवकरच पकडू असे त्यांनी सांगतले.