May 20, 2025 Tuesday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

पेण कोर्टातील लाचखोर सरकारी वकील दिनेश पाटील यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल.

प्रतिनिधी : मुंबई

पेण तालुक्यातील शिर्के गावातील लाचखोर माजी सरकारी वकील दिनेश जनार्दन पाटील हे पेण कोर्टात विशेष सरकारी अभियोक्ता (सरकारी वकील) या पदांवर कार्यरत असताना नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने दि ४/१२/२०२४ रोजी दहा हजार लाच घेताना पेण कोर्टात रंगेहाथ पकडून त्याचा वर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा न ३१३/२०२४ प्रमाणे रक्कम १०,००० लाच स्वीकारला गुन्हा दाखल करण्यात आला सदर ॲडव्होकेट दिनेश पाटील यांनी रक्कम १०,००० लाच स्विकारले.

त्यांना अटक झालेली बातमी पेपरात लाचखोर सरकारी वकील दिनेश पाटील म्हणून प्रसिद्ध झाल्या सदर बातम्या कात्रणे ॲडव्होकेट नागेश जगताप यांनी पेण कोर्टाच्या व्हाॅट्सप ग्रुप वर टाकल्या तसेच दहा हजार लाच लुचपत प्रकरणात साक्षीदार असलेल्याचा मनात राग धरून ॲडव्होकेट दिनेश पाटील यानी दि ०२/०५/२०२५ रोजी म्हात्रे हाॅसपीटल या सार्वजनिक ठिकाणी ॲड नागेश जगताप यांना जातीवाचक शिवीगाळ करत जीवे ठार मारणयाची धमकी दिली.

या बाबत लाचखोर माजी सरकारी वकील दिनेश जनार्दन पाटील यांवर पेण पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती कायद्या कलम 3(1)(r)(s) 3(2)(va) भारतीय न्याय संहिता कलम352(2)अंतर्गत गुन्हा न ८४/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय पोलिस अधिकारी पेण यांच्या मार्फत सदर गुन्हाचा तपास चालू आहे तरी आरोपी ॲडव्होकेट दिनेश पाटील यांपासून फिर्याद यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने आरोपी ॲडव्होकेट दिनेश पाटील यांना लवकरात लवकर अटक करण्यात मागणी फिर्याद नागेश जगताप यांनी केली आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top