रत्नागिरी : साहसी पर्यटकांना खुणावताहेत रांजण खळगे
रत्नागिरी : सह्याद्रीच्या खोऱ्यातील माचाळच्या डोंगरातून वाहणाऱ्या मुचकुंदी नदीतील सात धबधबे आणि त्या खालील दहा रांजण खळगे म्हणजे साहसी पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. ते रांजण खळगे निसर्गाचा चमत्कार आहे. आजूबाजूला गर्द झाडी, कड्या-कपाऱ्यांतून काढावा लागणारा मार्ग, रांजण खळग्यातून पोहून पुढे जाण्याचे थ्रिल अंगावर रोमांच आणणारेच आहे.