September 11, 2024 Wednesday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

IT Head of Publicity Appointment of Kunbi Yuva Mandal, Mumbai

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी युवा मंडळ यांच्या कुणबी युवा (मुंबई) प्रचारप्रमुख व सहप्रचारक प्रमुखपदांची नियुक्ती

कुणबी युवा मुंबईच्या प्रचार प्रमुखपदी संगमेश्वरचे सचिन रामाणे यांची नियुक्ती तर सहप्रचारक प्रमुखपदी कामेश घाडी (लांजा), निलेश कोकमकर (चिपळूण), रणजीत पाटील (मुरुड जंजिरा), सचिन देवळे (महाड, पोलादपूर) यांची नियुक्ती..!

मुंबई परेल : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी युवा मंडळ यांची कार्यकारणी व युवा प्रतिनिधी यांची संयुक्त संपर्कवार मिटिंग व कुणबी कलामंच कौतुक सोहळा अध्यक्ष माधव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 10 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता, कुणबी ज्ञाती गृह (वाघे हॉल), सेंट झेवियर स्ट्रीट, परळ, मुंबई -१२ येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी युवा मंडळाच्या प्रचारक विंग मध्ये सोशल मिडीयावर जनजागृती व प्रचार प्रसार करण्यासाठी नवीन शिलेदारांची नियुक्ती करण्यात आली.

कुणबी युवा मंडळाच्या कार्यक्रम, उपक्रमाचे प्रचार प्रसाराचे काम करण्यासाठी अधिकृत नियुक्त झालेल्या सर्व शिलेदारांना मार्गदर्शन व मौलिक सूचना करण्यात आल्या. प्रचारक म्हणून पुढील सक्रीय शिलेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. सत्यवान शिंदे (वैभववाडी – सिंधुदुर्ग), रुपेश चौगुले, वैभव चौकेकर (राजापूर), अविनाश आग्रे, विघ्नेश दैत (लांजा), केशव पीठे (तळा), प्रवीण ढवळ, शैलेश दळवी (संगमेश्वर), अमित कुलये, परेश पालये, एकनाथ निंबरे, अविनाश अंगोडे (रत्नागिरी), जितू लोखंडे, तेजस पवार, दिपेश पाटील (दापोली), संजय माळी, अविनाश टक्के (मंडणगड), नरेश म्हसकर, संजय काजारे, चंद्रकांत निंबरे, बंदिश अवेरे, सागर डावल, मंगेश पागडे, सचिन कांबळे (गुहागर), मितेश नवले, अशोक आंबेकर (महाड-पोलादपूर), भास्कर पवार, नामदेव भोस्तेकर (रोहा), मनोज डिके (मुरुड जंजिरा), प्रतीक उमावणे (शाहपूर), सर्व नव नियुक्त शिलेदारांचे अभिनंदन..!

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top