April 19, 2024 Friday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

Diwali of Raigad beach tourists

रायगडच्या समुद्रकिनारी पर्यटकांची दिवाळी

अलिबाग – बहुसंख्य कार्यालयांना रविवारपर्यंत सलग चार दिवस सुट्टी आहे. यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी हजारो पर्यटकांनी गुरुवारी सकाळपासून अलिबागसह जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांना पसंती दिली आहे. काही पर्यटकांनी माथेरानसह किल्ल्यांकडे मोर्चा वळवला. कोरोना संसर्ग कमी होत असताना पर्यटकांची जिल्ह्यात वाढती गर्दी व्यावसायिकांसाठी सुखावणारी ठरली. 

कोरोनासंदर्भातील नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळे खुली करण्यात आली. त्याचा चांगला परिणाम दिसत आहे. दिवाळीनिमित्त गुरुवारी लक्ष्मीपूजन, शुक्रवारी बलिप्रतिपदेची सुटी अनेक कार्यालयांना आहे; तर शनिवारी व रविवारी शासकीय सुट्टी आहे. तसेच शाळा, महाविद्यालये बंद असल्याने पर्यटकांनी सुटीचा आनंद लुटण्यासाठी रायगड जिल्ह्याला अधिक पसंती दिली.

दिवाळीच्या सुटीत आम्ही दर वर्षी अलिबाग, काशीद येथे येतो. धावपळीच्या जीवनातून मोकळीक आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.- सुरेश पवार, पर्यटक, मुंबईअलिबागच्या समुद्रकिनारी आम्ही दर वर्षी दिवाळीच्या सुटीत येतो. येथील माशांचा आस्वाद घेतो.- राकेश सावंत, पर्यटक, डोंबिवलीदिवाळीच्या सुटीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे व्यवसायिकांना पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळू लागले आहे.- शंकर ढोणुक्षे, व्यावसायिक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top