July 27, 2024 Saturday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

Politics

महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब व ॲड. नागेश अनंता जगताप साहेब यांच्या सोबत चर्चा करताना

प्रतिनिधी रायगड पेण तालुक्यातील रेशन माफिया व गहू तांदूळ चोर रास्त भाव धान्य रेशन दुकाने अध्यक्ष मोहन नारायण वेखंडे यांच्या पेण तालुक्यातील अनाधिकृत दुकाने विरोध तसेच त्यांच्या एकाच घरात तीन दुकाने१) खारपाले – मोहन नारायण वेखंडे२) फणस डोंगरी -किरण नारायण वेखंडे३) कासू -योगेश कमलाकर वेखंडे चालू असून मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांचे ऑनलाईन ठसे घेऊन प्रत्येकशात …

महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब व ॲड. नागेश अनंता जगताप साहेब यांच्या सोबत चर्चा करताना Read More »

“ज्यांनी माझ्या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हिसकावला, त्यांना माझं आव्हान आहे की…” उद्धव ठाकरेंचं जाहीर विधान!

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवरच आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपाला खुलं आव्हान दिलं आहे. उत्तर भारतीयांच्या मेळाव्याप्रसंगी …

“ज्यांनी माझ्या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हिसकावला, त्यांना माझं आव्हान आहे की…” उद्धव ठाकरेंचं जाहीर विधान! Read More »

Divide in ST employees' strike .. Employees start working in this district

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट..? या जिल्ह्यात कर्मचारी कामावर रुजू

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. हा संप मोडण्याची तयारी एसटी महामंडळाकडून सुरु आहे.
अलिबाग, रायगड : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. हा संप मोडण्याची तयारी एसटी महामंडळाकडून सुरु आहे. नवीन 2500 उमेदवारांना कामावर रुजू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. महाड एसटी डेपोत कंट्रोलर, सफाई कर्मचारी कामावर परतले आहे. मान्य झालेल्या मागण्यांमुळे कर्मचारी समाधानी आहेत. कर्मचारी कामावर रुजू झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, पडल्याची चर्चा सुरु झाली आहे.

ganpatipule-plan-changes-to contracting from

गणपतीपुळे आराखड्यातील बदल ठेकेदारधार्जिणे

रत्नागिरी : गणपतीपुळे पर्यटनस्थळासाठीचा १०२ कोटींच्या विकास आराखड्यात बदल करण्यात आला. त्याची माहिती ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि देवस्थान समिती यांना दिली नाही वा त्यांना विश्‍वासात घेण्यात आलेले नाही, असा आरोप करत केलेले बदल हे ठेकेदारधार्जिणे असल्याचा संशय आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे.

Kokan will get a good road soon

कोकणला मिळणार लवकरच चांगला रस्ता

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर माझे वैयक्तिक लक्ष आहे. मी कोकणला लवकरात लवकर चांगला रस्ता देणार. साहेबांना सांगा, हा विषय मी लवकरच संपवतोय, असा निरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिष्टमंडळाद्वारे राज ठाकरे यांना दिला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ११ वर्षे रखडले आहे. महामार्गाच्या या गोंधळाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) रस्ते आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी याबाबत रान उठवले होते.

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top