दापोली :– शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्य बाण आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला मिळतात आमदार योगेश कदम समर्थकांनी उध्वव ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेत घुसून गोंधळ घातला. आम्हीच खरे शिवसैनिक आमचाच खरा पक्ष आहे. त्यामुळे तुम्ही कार्यालयात बसायचे नाही, तुमचे इथे काय काम आहे, असे म्हणत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दापोली शिवसेना शहर शाखेतून बाहेर काढत शिवसेना शहर शाखा ताब्यात घेतली.
शिवसेना शाखा ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे शिवसेना शाखेत घुसले. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या दोन्ही गटात जोरदार राडा झाला. यावेळी योगेश कदम समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यामुळे दापोलीत तणावाचे वातावरण आहे.