निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीसाठी घातक : उद्धव ठाकरे
मुंबई :- निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन घोषणा करावी की लोकशाही संपली आहे. देशात बेबंदशाहीला सुरुवात झाली आहे. पक्ष कोणाचा बरोबर आहे आणि कोणाच्या बरोबर आहे, हे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या संख्येवर ठरवले. तर कोणताही धनाढ्य माणूस पक्ष विकत घेईल, असे शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
चोराला राजमान्यता देणे काही जणांना भूषणावह वाटत असेल मात्र, चोर हा चोरच असतो. ज्यापद्धतीने त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना नाव त्यांनी मिंधे गटाला दिले. त्यावरुन मला वाटतय की महिन्याभरात मुंबई महापालिकेच्या निवडणूका होतील, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले आहे. शिवाय ‘शिवसेना’ हे नाव देखील शिंदे गटाला देण्यात आले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.