September 11, 2024 Wednesday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

“ज्यांनी माझ्या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हिसकावला, त्यांना माझं आव्हान आहे की…” उद्धव ठाकरेंचं जाहीर विधान!

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवरच आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपाला खुलं आव्हान दिलं आहे. उत्तर भारतीयांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “काल त्यांनी माझा धनुष्यबाण हिसकावून घेतला, आता स्वत: प्रभूरामचंद्र माझ्यासोबत आले आहेत. हा योगायोग म्हणावा की आणखी काय माहीत नाही. परंतु असं कधीकधी अशा गोष्टी होत असतात. मी तर काल रस्त्यावर उतरून आव्हान दिलं आहे. ज्या लोकांनी माझ्या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हिसकावला आहे, त्यांना मी आव्हान दिलं आहे की जर तुम्ही मर्द असाल, तुमच्याच हिंमत असेल तर तुम्ही माझा चोरलेला धनुष्यबाण घेऊन माझ्यासमोर या, मी माझी मशाल घेऊन समोर येतो पाहूयात काय होतं?”

याशिवाय, “एक गोष्ट नक्की की मागील २५-३० वर्षांपेक्षाही जास्त तुम्ही आणि आम्ही एकमेकांचे विरोधक होतो. काँग्रसे, राष्ट्रवादी आणि शिवसेना. मी उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रीय नाही म्हणत. मग असं काय घडलं की आम्ही तर हिंदुत्ववादी होतो, आजही मी म्हणतो की मी हिंदू आहे, मी हिंदुत्व कधी सोडले नाही आणि सोडणारही नाही. मी तर भाजपाला सोडलंय हिंदुत्व नाही सोडलं. भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही आणि त्यांचं जे हिंदुत्व आहे ते आमचं हिंदुत्व नाही. ते आम्हाला मान्य नाही मी उघडपणे सांगतो. जे माझ्या वडिलांनी मला शिकवलं ते हिंदुत्व हे नाही. माझ्या वडिलांच्या भाषेत सांगायचं तर राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे. आमचं जे हिंदुत्व आहे ते देशाची जुडलेलं आहे. परंतु यांचं हिंदुत्व सांगतं की आपसात भांडणं लावा, कुटुंबात भांडणं लावा, पक्षात भांडणं लावा आणि सत्ता मिळवा.” असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top