कोकणला मिळणार लवकरच चांगला रस्ता
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर माझे वैयक्तिक लक्ष आहे. मी कोकणला लवकरात लवकर चांगला रस्ता देणार. साहेबांना सांगा, हा विषय मी लवकरच संपवतोय, असा निरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिष्टमंडळाद्वारे राज ठाकरे यांना दिला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ११ वर्षे रखडले आहे. महामार्गाच्या या गोंधळाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) रस्ते आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी याबाबत रान उठवले होते.