रायगड प्रतिनिधी :
महासंचालक लाचलुचपत प्रतिबंध विभाग याकडे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ निरीक्षक मारुती हरी पवार यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 13 (1)( ब )13 (1)( इ )13(२) अंतर्गत अंसपदा बाळगण्याबाबत गुन्हा दाखल कारवाई करता ॲड .नागेश अनंता जगताप यांनी तक्रार दाखल
मारुती हरि पवार हे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ येथे निरीक्षक या पदावर सन 2002 ते आजपर्यंत कार्यरत आहेत सदर अधिकारी सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन झाल्यापासून आज पर्यंत एकाच ठिकाणी कार्यरत आहे सदर व्यक्तीला राजकीय हस्त असल्याने रायगड रक्षक मध्ये त्याच्या मनमर्जीने पैसे घेऊन भर्ती करत आहे सदर भरतीमध्ये ज्या गोरगरीब मुलांची सन 2017 ते आज पर्यंत निवड झालेली आहे त्यांना कामावर रुजू करून घेत नसून त्यांच्याकडे पैशाची मागणी करत आहे मात्र ज्या मुलांवर राजकीय वर्धा हस्त आहे अशा मुलांची अंदाधुंदपणे भरती करत आहे आणि याद्वारे भरपूर प्रमाणात कोट्यावधी रुपयाची असंपदा गोळा केली आहे या अधिकाऱ्याकडे पनवेल महानगर हद्द मध्ये स्वतःच्या फ्लॅट चार चाकी गाडी सोने पैसा असंपदा गोळा केलेली आहे तरी शासन परिपत्रक नुसार शासकीय अधिकारी मारुती हरी पवार यांनी स्वतःच्या नावाने किंवा कुटुंबाच्या नावाने केलेल्या मिळकती ज्याची किंमत दोन महिन्याच्या वेतनापेक्षा अधिक असेल अशा जंगम मालमत्तेचा प्रत्येक अहवाल आपल्या वरिष्ठ कार्यालयास कळविणे बंधनकारक असताना देखील शासनाचे दिशाभूल करून फसवणूक करून करोडो रूपयांची असंपदा जमवली तरी मारुती हरी पवार अधिकाऱ्याची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम १३(१) ब 13(१) (इ)१३ (२) अंतर्गत कारवाई करून गुन्हा दाखल करण्याबाबत ॲडहोकेट नागेश अनंता जगताप यांनी म महासंचालक लाच लुचपत विभाग मुंबई, पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग ठाणे, उप पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग नवी मुंबई यांकडे तक्रार दाखल करण्यात आली