रायगड प्रतिनिधी :
रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कार्यरत असलेल्या निरिक्षक मारूती हरी पवार हे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ सन 2002 स्थापन झाल्यापासून ते आज पर्यंत एकाच ठिकाणी कार्यरत आहेत सदर व्यक्ती 22 वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने रायगड जिल्हा सुरक्षा भरती प्रक्रियेमध्ये मक्तेदारी स्वरूप आलेले आहे मारूती पवार यांच्या च्या मनमर्जीने प्रमाणे अंधाधुंद पद्धतीने भरती चालू आहे सन 2015 ते आज पर्यंत निवड झालेल्या मुलांना नोकरी पासून वंचित ठेवलेले असून अंधाधुंद सुरक्षा रक्षक भरती घोटाळा केलेला आहे करोडो रुपये संपत्ती गोळा केली.
याबाबत असंख्य तक्रारी शासनाकडे दाखल झालेल्या आहेत व शासन परिपत्रकानुसार तीन वर्षांनी बदली होणे आवश्यक होते परंतु आजपर्यंत झाली नव्हती यांचे बदली करण्याकरता व सुरक्षा रक्षक भरती घोटाळाप्रकरणी ॲडव्होकेट नागेश अनंता जगताप यांनी यांनी मारुती हरी पवार निरीक्षक यांच्याविरुद्ध प्रधान सचिव( कामगार )मंत्रालय व कामगार आयुक्त यांची भेट घेऊन यांकडे तक्रार दाखल करत शासन निर्णय प्रमाणे एकाच पदावर 15 ते 20 वर्ष कालावधी उलटून गेला असला तरी कार्यरत असलेले मारुती हरी पवार यांची तात्काळ बदली करण्यात यावी याबाबत तक्रार करण्यात आली.
लवकरच मारुती पवार यांचे बदली न झाल्यास उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका दाखल करणार असल्याबाबतचे नोटीस देण्यात आली तरी प्रधान सचिव कामगार मंत्रालय व कामगार आयुक्त यांकडून लवकरच बदली करणार असल्याचे कळविण्यात आले