रायगड प्रतिनिधी :
सावरसाई ग्रामपचायतीचे उपसरपंच योगेश दिवेकर हे आपल्या नावा पुढे लावणारी वकील सनद( ॲड)हि खरी नसुन बोगस आहे , तसचे उपसरपंच योगेश दिवेकर यांच्या कडे कोणतीही ही सनद नाही महाराष्ट्र राज्य गोवा बार कौन्सिल नोंदणी क्रमांक तसेच ऑल इंडिया बार कौन्सिल याच्या कडे देखील योगेश दिवेकर याची सनदची नोंदणी नसल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य गोवा बार कौन्सिल यांनी दिले . आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री. रोहित शिंदे यांनी पोलिस उपविभागिया अधिकारी याच्या कडे गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला.
योगेश दिवेकर हे त्यांच्या नावासमोर ॲडव्होकेट हे शासकीय व सामान्य लोकांमध्ये लावून दिशाभूल करत फसवणूक करत असल्याचे तसेच कागदपत्रांवर देखील ॲडव्होकेट हे लावत असून सदर पदवी ही बोगस आहे , सामान्य लोकाची दिशा भूल करण्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला लवकरच सावरसाई ग्रामपंचायत उपसरपंच योगेश दिवेकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे