June 16, 2024 Sunday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

Kunbi Yuva Lanja T-Shirt Distribution Ceremony was held at Kunal Samajonnati Sangh's Parel Mumbai.

कुणबी युवा लांजा टी-शर्ट वितरण सोहळा कुणबी समाजोन्नती संघाच्या परेळ मुंबई इथे जोशात संपन्न झाला

मुंबई :- दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी कुणबी समाजोन्नती संघाच्या परेल येथील कार्यालयात कुणबी युवा लांजाच्या टी-शर्टच्या वितरणला सुरुवात झाली. या वितरणाचा शुभारंभ संघ कार्यकारणी प्रतिनिधी तथा वरीष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश तरळ, लांजा शाखा सचिव संदीप पडये, खजिनदार प्रकाश चंदूरकर व लांजा शाखाचे इतर पदाधिकारी यांच्या हस्ते व लांजा शाखा अध्यक्ष श्री. संतोष माटल यांच्या मार्गदर्शनानुसार पार पडला.
 
या वेळी टी शर्ट छपाई करण्यामाचा उद्देश काय आहे हे युवा सहसचिव श्री मनोहर लोकम यांनी आपले विचार मांडताना स्पष्ट केले की, संघटना घरोघरी पोचवी, समाजात जनजागृती आणि समाजाभिमान जागृत व्हावा, आजची युवा पिढी समाज संघटनेत आकर्षित व्हावी इत्यादी हेतूने युवा लांजाच्या पदाधिकारी यांनी हे टी-शर्ट तयार केले आहे.
 
कुणबी युवाच्या या टी-शर्ट ला प्रचंड प्रतिसाद मिळत असून अजूनही ऑर्डर घेऊन समाजबांधव – युवकांना टी शर्ट देणे चालु आहे. कुणबी युवा लांजा ने हाती घेतलेला हा स्तुत्य उपक्रम असून या टी शर्ट मुळे नक्कीच समाजात (खास करून युवकांमध्ये) नवचैतन्य, जागृती येऊन समाजाविषयी आदर व अभिमान वृद्धिंगत व्हायला मदत होईल अशी अपेक्षा उपस्थित लांजा शाखा पदाधिकारी यांनी व्यक्त केली.
 
या टी-शर्ट साठी युवा अध्यक्ष सुहास दूडये, युवा सचिव अविनाश आग्रे,सहसचिव मनोहर लोकम, शाहू सावंत, विघ्नेश दैत, प्रचारक कामेश घाडी, सचिन मांडवकर, युवा कार्यकर्ते चेतन आग्रे, विलास बापर्डेकर, रमेश आग्रे इत्यादी युवा पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.
 
अतिशय आकर्षक, सूंदर डिझाइन असलेले हे टी शर्ट फक्त ३०० रुपयांत विविध साईज मध्ये उपलब्ध आहे. ज्यांना ज्यांना हे हवे असेल त्यांनी आगाऊ रक्कम देऊन ते बुक करावे.
अधिक माहिती करीता संपर्क :-
📱कामेश घाडी :- 8976300945
📱अविनाश आग्रे :- 7021442239
📱चेतन आग्रे :- 8082484584
📱विघ्नेश दैत :- 8446952790
📱सचिन मांडवकर :- 8169574953
📱शाहू सावंत :- 9819390430
पेमेंट (Payment)
1) कॅश रोख 
2) Google Pay – 9757056944
नाव : मनोहर लोकम
 
प्रचारप्रमुख – कामेश घाडी
कुणबी समाजोन्नती संघ, शाखा लांजा
कुणबी युवा लांजा, मुंबई 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top