July 27, 2024 Saturday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

Ratnagiri: While accepting a bribe of Rs 50,000, a junior engineer was caught red handed by the Anti Corruption Bureau

रत्नागिरी : ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंत्याला रंगेहात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने

ठेकेदाराकडे पैसे मागितले आणि फसला; लाचखोर कर्मचारी अटकेत!

रत्नागिरी : खेड येथील जिल्हा परिषदेचा लाचखोर कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला आहे. कामाचं मुल्यांकन करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता चंद्रकांत गणपत गमरे याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
 
चंद्रकांत गमरे हा ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात सापडल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. खेड तालुक्यात गणेशनगर भरणे येथे पंचासमक्ष करण्यात आलेल्या या कारवाईनंतर खळबळ उडाली आहे.
 
तक्रारदार हे नोंदणीकृत ठेकेदार असून त्यांनी मंडणगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १४ उपकेंद्रांची दुरुस्ती व अद्ययावतीकरण करण्यासाठी ई- निवीदा भरलेली होती. त्या अनुषंगाने निविदा रक्कम ५० लाख ६ हजार ४९९ रुपये प्रमाणे काम करण्याचे कार्यारंभ आदेश मिळाले होते. सदर कामाची देखरेख व कामाचे मुल्यांकन करण्यासाठी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यामार्फत कनिष्ठ अभियंता लोकसेवक गमरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
तक्रारदार यांनी अद्यापपर्यंत पूर्ण केलेल्या कामाचं मुल्यांकन करून बिलाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासाठी लोकसेवक गमरे याने तक्रारदार यांनी केलेल्या कामाच्या रक्कमेच्या २ टक्क्यांप्रमाणे ६० हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने चंद्रकांत गणपत गमरे यांच्याविरुध्द रत्नागिरी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २४ सप्टेंबर रोजी तक्रार दिली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या पडताळणी कारवाईमध्ये चंद्रकांत गमरे याने तक्रारदाराकडे त्यांनी केलेल्या कामाचे मुल्यांकन वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे व ती स्वीकारल्याचं मान्य केल्याचं निष्पन्न झालं आहे.
 
दरम्यान, सदर सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण ताटे, सपोफौ संदीप ओगले, पोलीस हवालदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, पोलीस नाईक योगेश हुंबरे, पोलीस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top