मिऱ्या-नागपूर चौपदरीकरण; पाच गावांसाठी ७३ कोटींचा निधी
महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडणाऱ्या मिऱ्या-नागपूर मार्गाच्या चौपदरीकरणा
महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडणाऱ्या मिऱ्या-नागपूर मार्गाच्या चौपदरीकरणा
कोकणात ओबीसी समजबांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालावर विराट मोर्चा |कोकणात उसळला ओबीसींचा जनसैलाब… महिलांचा प्रचंड सहभाग…! जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. आता विधानसभा, लोकसभेत झेंडा फडकविण्याची गर्जना
कोकणातून प्रवास करताय तर सावधान… चिपळूणजवळचा परशुराम घाट खचतोय..!
रत्नागिरी : कोरोनातील टाळेबंदीनंतर बंद ठेवण्यात आलेले रत्नागिरी शहरातील प्रसिध्द पर्यटनस्थळ थिबा राजवाडा, लोकमान्य टिळक स्मारकासह राज्य संरक्षित स्मारके आणि म्युझिअम पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे रत्नागिरीत फिरायला येणार्यांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
कोकणातील सहा सिंचन प्रकल्पांच्या निविदा स्थगितीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. कोकण : कोकणातील सहा सिंचन प्रकल्पांच्या निविदा स्थगितीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. तसा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कोकण विभागातील सहा प्रकल्पांमधील यापूर्वीचे निविदा विखंडनाचे आदेश रद्द करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली
कुणबी युवा मुंबईच्या प्रचार प्रमुखपदी संगमेश्वरचे सचिन रामाणे यांची नियुक्ती…
तर सहप्रचारक प्रमुखपदी कामेश घाडी (लांजा), निलेश कोकमकर (चिपळूण), रणजीत पाटील (मुरुड जंजिरा), सचिन देवळे (महाड, पोलादपूर) यांची नियुक्ती..!
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. हा संप मोडण्याची तयारी एसटी महामंडळाकडून सुरु आहे.
अलिबाग, रायगड : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. हा संप मोडण्याची तयारी एसटी महामंडळाकडून सुरु आहे. नवीन 2500 उमेदवारांना कामावर रुजू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. महाड एसटी डेपोत कंट्रोलर, सफाई कर्मचारी कामावर परतले आहे. मान्य झालेल्या मागण्यांमुळे कर्मचारी समाधानी आहेत. कर्मचारी कामावर रुजू झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, पडल्याची चर्चा सुरु झाली आहे.
रत्नागिरी : गणपतीपुळे पर्यटनस्थळासाठीचा १०२ कोटींच्या विकास आराखड्यात बदल करण्यात आला. त्याची माहिती ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि देवस्थान समिती यांना दिली नाही वा त्यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही, असा आरोप करत केलेले बदल हे ठेकेदारधार्जिणे असल्याचा संशय आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे.
कुणबी समाजोन्नती संघ संलग्न कुणबी युवा मुंबई आयोजित ‘बळी पहाट – शोध इतिहासाचा,सत्य सांस्कृतीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन दामोदर हॉल,मुंबई येथे करण्यात आले होते.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्यावतीने समाजाला संघटीत व जागृत करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.कोकणातील आणि राज्यातील ओबीसी कुणबी समाजाला संविधानाने दिलेल्या हक्क अधिकारासाठी जागृत करण्याचे कार्य गेली १०१ वर्ष हि मातृसंस्था करीत आली आहे.सर्व समाजाला पूरक असे काम या सामाजिक संस्थेचे नेहमीच राहिले आहे.
रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचारी काम बंद आंदोलनावर ठाम राहिल्यामुळे एकही फेरी सुटू शकली नाही. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झाले पाहिजे, असा अध्यादेश आला पाहिजे, याकरिता कर्मचारी अडून बसले आहेत.