रायगड प्रतिनिधी :
सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर मागील दीड महिन्या पासून तहसीलदार ऑफिस मध्ये वारंवार फेऱ्या मारुन देखिल तहसिलदार यांच्या कडून दखल घेतली जात नसल्यामुळे अखेर १ एप्रिल २०२४ रोजी पेण तहसिलदार यांच्या दालनात उपोषण करण्याचे निच्छित झाल्याचे अंकिता सोंडकर यांनी सांगतले, सदर प्रदूषण हे खुप घातक आहे हे लक्षात आणुन दिले असुन कारवाई का होत नाही तसेच माहिती लपुन कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरु आहे असा प्रश्न देखील तहसिलदार यांना केला.
सावरसई ग्रामपंचायत मधुन प्राप्त झालेल्या माहिती अधिकाराच्या माहिती नुसार खुप मोठ्या धक्कादायक गोष्टी समोर आल्याचे सांगितले लवकरच पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार जनते समोर आणणार असुन पुढील १० दिवसात जनहितयाचिका माननीय न्यालयात दाखल करणार व या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व दोषिन वर कारवाई होण्यासाठी न्यायालईन लढा देणार असे सांगतले.