April 24, 2024 Wednesday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

अखेर सात वर्षांनी मिळाले अंगणवाडी सेविकेचे एक रक्कमी लाभ मानधन  आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन संघटनेच्या पाठपुरवठ्याला यश…

प्रतिनिधी पनवेल :

सरकारी काम आणि बारा महिने थांब ही अवस्था आज सुद्धा अनेक सरकारी विभागात पाहण्यास मिळत आहे, त्याचप्रकारे पनवेल येथील अंगणवाडी सेविका गंगाबाई कांबळे सेविका म्हणून 1986 मध्ये रुजू झाल्या शिवकर ते भोकरपाडा हे पाच किलोमीटर (5km) अंतर रोज पायी कापून तेथील लहान मुलांचे भविष्य घडविण्यास साठी काम करीत, अ पासून ज्ञ पर्यंत मुळाक्षरांची ओळख ही अंगणवाडीतच झाली, अंगणवाडीतल्या बाई अगदी लहान मुलांबरोबर त्यांचं मन अंगणवाडीत रमावं याकरिता नानाविध प्रयोग करत असायच्या, थोडक्यात त्या मुलांना शाळेची ओढ इथूनच लागण्यास सुरुवात व्हायची, बालमनावर संस्कार करण्याचं काम या सेविका करतात, सुशिक्षित सुजाण पिढी घडविण्यात या सेविकांच्या खारीचा वाटा आहे.

गंगाबाई कांबळे यांचे कार्य कौतुकास्पद आहे हे नक्कीच, परंतु तटपुंज मानधनावर अनेक तासन्तास काम करून सुद्धा त्यांच्या अनेक प्रश्नाकडे समस्या कडे सरकारने दुर्लक्ष केले आहे, गंगाबाई कांबळे हे 2017 मध्ये आपल्या 31 वर्ष सेविका म्हणून कार्य केले.

त्यांना सेवानिवृत्तीनंतर एक रकमे लाभ मिळणे अपेक्षित होते परंतु सरकारी तांत्रिक अडचणी मुले PFMS क्रमांक उपलब्ध नसल्याने आपल्या हक्काच्या पैशांसाठी गेले सात वर्ष (7year ) झुंज देत होते , अखेर सदरील परिस्थिती आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशनचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रज्ञेश कांबळे, व अध्यक्ष श्याम पाटील यांना समजता त्वरित जिल्हाधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून सेविकेला एक रकमे मानधन त्वरित मिळावे यासाठी पाठपुरवठा करून, स्थानिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अखेर 2024 मध्ये त्यांना त्यांचे मानधन मिळाले, या पाठपुरवठ्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे PFMS क्रमांक उपलब्ध नव्हते अशा सेविकांना हमीपत्र सादर करून त्यांना त्यांची मानधन देण्यात आले. आखिर आरटीआय ह्यूमन राईट एक्टिविस्ट असोसिएशन कार्याला सलाम..!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top