February 6, 2026 Friday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

दादर येथे कोकणची पारंपरिक लोककला असलेला “कोकणचे खेळे अर्थात नमन” हा सांस्कृतिक कार्यक्रम मुचकुंदी परिसर विकास संघ, लांजा–राजापूर (मुंबई) यांच्या वतीने उत्साहात पार पडला.

प्रतिनिधी मुंबई :

मुचकुंदी परिसर विकास संघ, लांजा–राजापूर (मुंबई) यांच्या वतीने लोककला संवर्धन व वार्षिक निधी संकलनाच्या उद्देशाने बुधवार दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथील श्री. शिवाजी मंदिर, दादर येथे कोकणची पारंपरिक लोककला असलेला “कोकणचे खेळे अर्थात नमन” हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.


या कार्यक्रमास सन्माननीय श्री. कामेश घाडी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष – आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन व रिडबुक फाउंडेशन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमप्रसंगी श्री. कामेश घाडी यांनी मुचकुंदी परिसर विकास संघाचे अध्यक्ष श्री. अजय मांडवकर तसेच संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यासाठी यथोचित सन्मान केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच नवतरुण विकास मंडळ, सडवली (उगवत वाडी), तालुका–लांजा चे प्रमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी श्री. कामेश घाडी यांनी “नमन” या लोककलेचे तसेच संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले.


या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, संलग्न वाडी–गाव मंडळांचे पदाधिकारी, संस्था हितचिंतक तसेच दोनशेहून अधिक सन्मानिकाधारक उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या दातृत्वपूर्ण सहकार्यामुळे संस्थेचा वार्षिक निधी संकलनाचा उद्देश यशस्वी झाल्याचे सांस्कृतिक विभागीय प्रमुखांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आर्थिक व व्यवस्थापकीय सहकार्य करणाऱ्या मान्यवरांमध्ये AS Advisory व दीया ट्रॅव्हल्सचे मालक प्रो. प्रा. कांचन पवार, श्री. अमोल पळसमकर, वनिता इंटरप्राईजचे प्रो. प्रा. श्री. स्वप्नील मिरजोळकर, श्री. उमाकांत पालकर, PSI श्री. ज्ञानेश येडगे (मुंबई पोलीस उपनिरीक्षक), श्री. रविंद्र मटकर (अध्यक्ष – नमन लोककला संस्था, अखंड भारत क्षेत्र), श्री. संतोष गांगण, श्री. प्रकाश कांबळे (नमन मंडळ प्रमुख) आदी मान्यवर उपस्थित होते.


दरम्यान, संस्थेच्या शैक्षणिक विभागांतर्गत “दहावी परीक्षेला सामोरे जाताना” या संकल्पनेवर आधारित ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिराबाबतही कार्यक्रमात उल्लेख करण्यात आला. या उपक्रमासाठी विभाग प्रमुख श्री. वैभव भगते सर व वेध दशक पूर्ती टीम यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या
श्री. तानाजी तळेकर (सर्वाधिक सन्मानिका वितरण),
श्री. संतोष घेवडे (कामकाज तपशील नोंदणी)
आणि श्री. अमर गोरुळे (आर्थिक व्यवहार व्यवस्थापन)
यांचाही मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने सन्मान करण्यात आला.
या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, कलाकार, हितचिंतक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आयोजक संस्थेतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top