April 23, 2026 Thursday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

कळसवली,तळेकरवाडी येथे ११ मे रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन

प्रतिनिधी रत्नागिरी :

कळसवली, तळेकरवाडी येथे राधाकृष्ण सेवा मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायण महापूजा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. सदरची महापूजा सोमवार, दिनांक ११ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

या सोहळ्यास मा.श्री. किरण (भैया) सामंत साहेब (लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा आमदार) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, मा.श्री. प्रतिक मटकर साहेब (जि. परिषद सदस्य), मा. अपूर्वा ताई सामंत (शिवसेना युवा नेतृत्व), मा.श्री. गौतम जाधव साहेब (पंचायत समिती सदस्य), तसेच मा.श्री. देवेश तळेकर साहेब (सरपंच, कळसवली) आणि मा.श्री. स्वप्निल गणपत मिरजोळकर साहेब (प्रो.प्रा.वनिता एंटरप्राइजेस) या मान्यवरांचीही उपस्थिती लाभणार आहे.

या सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये क्रिकेट स्पर्धा, शैक्षणिक उपक्रम तसेच रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असून, गावातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी हे कार्यक्रम आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.

नमनप्रेमींसाठी विशेष आकर्षण म्हणून श्री देवी वाघजाई भरारी नाट्य नमन मंडळ, ओझरे खुर्द (देवरुख) यांचे बहुरंगी नमन सादर होणार असून, हा कार्यक्रम रात्री १०.३० वाजता रंगणार आहे.

तसेच, उपस्थित भाविकांसाठी तीर्थप्रसाद व महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन राधाकृष्ण सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top