June 5, 2026 Friday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

आरटीआय ह्युमन राइट्स अ‍ॅक्टिविस्ट असोसिएशनतर्फे हर्चे, रत्नागिरी येथे भव्य वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती मोहिमेचा उत्साहात शुभारंभ

प्रतिनिधी | रत्नागिरी :

भारत सरकारकडे नोंदणीकृत “आरटीआय ह्युमन राइट्स अ‍ॅक्टिविस्ट असोसिएशन” तर्फे हर्चे, ता. लांजा, जि. रत्नागिरी येथे भव्य वृक्षारोपण व पर्यावरण जनजागृती मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. कामेश घाडी यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रेरणादायी व समाजोपयोगी उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

आजच्या वाढत्या प्रदूषण, जंगलतोड आणि पर्यावरणीय संकटांचा गांभीर्याने विचार करून संस्थेने यावर्षी “पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती” हा मुख्य विषय हाती घेतला आहे. त्याअंतर्गत १२ मे ते १५ मे या कालावधीत हर्चे व परिसरात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले.

🔰 मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे :

◾ “एक सदस्य – एक झाड” अभियान
या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत संस्थेच्या देशभरातील प्रत्येक सदस्याला किमान एक झाड लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानातून देशभरात १ लाख वृक्षारोपण करण्याचा निर्धार संस्थेने केला असून, या ऐतिहासिक मोहिमेचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात आला.

◾ भव्य वृक्षारोपण मोहीम व पर्यावरण जनजागृती अभियान
कोकणातील पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व असलेल्या रत्नागिरी परिसरात प्रस्तावित रिफायनरीसारख्या प्रकल्पांमुळे होणाऱ्या संभाव्य पर्यावरणीय परिणामांबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. माहितीपूर्ण पोस्टर्स, जनसंपर्क आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले.

◾ हरित कोकण – सुरक्षित भविष्य
ग्रामीण भागात हरित पट्टा वाढवणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि नागरिकांना वृक्षसंवर्धनासाठी प्रेरित करणे, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना श्री. कामेश घाडी म्हणाले,
“आज झाडे लावणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण करण्याची काळाची गरज आहे. चला, आपण सर्व मिळून पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येऊया… एक झाड लावा आणि भविष्यातील पिढी वाचवा!”

या मोहिमेला ग्रामस्थ, शेतकरी बांधव, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थेच्या सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उत्तम नियोजन, प्रभावी जनजागृती आणि समाजातील सकारात्मक सहभागामुळे कार्यक्रमाला मोठे यश मिळाले.

🌿 विशेष आवाहन :
या महावृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी झाडे, रोपे किंवा आर्थिक स्वरूपात सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. “आपले छोटेसे योगदानही पर्यावरणासाठी मोठा बदल घडवू शकते.”

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
८९७६३००९४५ / ९९३०९९२२५५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top