मुंबई प्रतिनिधी :
जागतिक ग्राहक दिनानिमित्त आरटीआय ह्युमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन तर्फे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन रविवार, दिनांक १५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शारदाश्रम विद्यामंदिर , डॉ. भवानीशंकर रोड, दादर (पश्चिम), मुंबई येथे पार पडणार आहे.
कार्यशाळेतील प्रमुख विषय
माहितीचा अधिकार कायदा २००५,
मानवाधिकार कायदा,
ग्राहक संरक्षण कायदा २०१९,
लोकपाल व लोकायुक्त कायदा २०१३,
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५,
भ्रष्टाचारविरोधी प्रभावी लढा कसा उभारावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रमुख मार्गदर्शक व वक्ते :
कार्यक्रमात ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अब्राहम आढाव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून माहिती अधिकार कायद्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आरटीआय ह्युमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष व ‘आरटीआय टाइम्स’चे संपादक मा. श्री. कामेश घाडी हे देखील विविध कायदेविषयक विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. राजेश माकोडे राहणार आहेत.
कायदेविषयक विषयांमध्ये रस असलेल्या नागरिकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्क : 9930992255 / 8976300945 📞
असोसिएशनच्या सर्व सभासदांसह कायदेविषयक विषयांमध्ये रस असलेल्या नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी असोसिएशन हेल्पलाईन तसेच पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे. कार्यशाळेसाठी नोंदणी शुल्क ३०० रुपये ठेवण्यात आले असून नोंदणी UPI द्वारे स्वीकारली जाणार आहे. सहभागींसाठी चहा, अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
