रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कमी होऊ लागला असून ग्रामीण भागातील शंभर टक्के शाळा सुरू झाल्या आहेत; मात्र अजूनही कोरोनाची भीती शहरी भागातील शाळांमध्ये आहे. प्राथमिकच्या ९ आणि माध्यमिकच्या ८८ अशा मिळून ९७ शाळा अजूनही बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर शासनाने ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष अध्यापन सुरू करण्याचा निर्णय घेतला.
रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक शाळांमधील शैक्षणिक कामकाज वेगाने सुरू झाले आहे. गेले अनेक दिवस ऑनलाईन शिक्षणात नेटवर्कची अडचण येत असल्याने ग्रामीण भागात विद्यार्थ्यार्ची गैरसोय होत होती. प्रत्यक्ष शिकवणीमुळे गेल्या दीड वर्षातील शिक्षणांचा गोंधळ कमी होणार आहे. जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या १ हजार ६३४ प्राथमिक शाळा असून त्यात एकूण विद्यार्थी ३२ हजार ०३७ मुले आहेत. १ हजार ५९७ शाळा सुरू झाल्या असून त्यातील २५ हजार ६५४ विद्यार्थी शाळेत हजर झाले आहेत. मात्र शहरी भागातील ९ शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत.
माध्यमिकच्या ४२६ पैकी ४१६ शाळा सुरू झाल्या असून ८५ हजार ६७५ पैकी ६५ हजार ६८९ विद्यार्थी हजर झाले आहेत. शहरातील ८८ शाळा बंद असून २४ हजार ३६९ विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यातील १० हजार ६७२ पैकी ९ हजार ९९२ शिक्षक प्रत्यक्ष शिकवणीसाठी हजर झालेले आहेत. ६८० शिक्षक अजूनही हजर झालेले नाहीत.स्वच्छतेचाखर्च शाळांवरकोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरू करण्यापूर्वी स्वच्छ करण्यात आल्या. त्यासाठी शासनाकडून निधी आलेला नाही. गतवर्षी सादीलमधून मिळणाऱ्या अनुदानातून हा खर्च केला होता. यंदा अनेक शाळांनी लोकसहभागामधून आवश्यक दुरुस्त्या, स्वच्छता केली.