कुणबी समाजोन्नती संघ संलग्न कुणबी युवा मुंबई आयोजित 'बळी पहाट - शोध इतिहासाचा, सत्य सांस्कृतीचा' या कार्यक्रमाचे आयोजन दामोदर हॉल, मुंबई येथे करण्यात आले होते.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्यावतीने समाजाला संघटीत व जागृत करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोकणातील आणि राज्यातील ओबीसी कुणबी समाजाला संविधानाने दिलेल्या हक्क अधिकारासाठी जागृत करण्याचे कार्य गेली १०१ वर्ष हि मातृसंस्था करीत आली आहे. सर्व समाजाला पूरक असे काम या सामाजिक संस्थेचे नेहमीच राहिले आहे. १०१ वर्षाची गौरवास्पद वाटचाल असलेल्या संघटनेची युवा विंग “मुंबई युवा मंडळ, हे प्रचंड ताकदीने प्रबोधनाची वाट धरून समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करीत आहे.समाजात पसरलेली अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, जमीन कुळकायदा, शिक्षण, रोजगार, आरोग्य तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातून समाज प्रबोधन करण्याचे काम कुणबी युवा मुंबई करीत असून ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजात जनजागृती, आंदोलन करण्याचे कार्य युवकांच्या माध्यमातून सातत्याने होते.
कुणबी बहुजन समाजातील युवाशक्ती जागृत झाली असून आपल्या हक्क अधिकार आणि रणनीतीवर आधारित संघटन बांधणीचे व पुढील दिशा कोणत्या प्रकारे असेल याचे विचार मंथन करण्यासाठी प्रत्येक वर्षी “बळी पहाट” साजरी करण्यात येते. यावेळी बोलताना बळीराजाचे सरकार आल्याशिवाय खऱ्या अर्थाने बळीराजा सुखी होणार नाही असे मत व्यक्त केले. तसेच कोकणातील कुणबी समाजाची लढाई महाराष्ट्रातील ओबीसी समाज ताकदीने लढेल असे उपस्थितांना आश्वाशीत केले.
यावेळी उपस्थित आमदार अनिकेत तटकरे यांना विधानपरिषद मध्ये ओबीसींच्या समस्यांविषयी आवाज उठवण्याची सूचना केली. या कार्यक्रमास राज्यभरातील विविध ठिकाणच्या कुणबी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती संपूर्ण हॉल तुडुंब भरला होता. यावेळी 29 सक्रिय शिलेदार यांचा गौरव करण्यात आला तसेच कुणबी महिला मंडळ यांनी आयोजित केलेल्या रांगोळी व पाककला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सुद्धा यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन माधव कांबळे व त्यांच्या संपूर्ण टीमने उत्कृष्टपणे केले होते.
या “दिवाळी पहाट” कार्यक्रमास आमदार अनिकेत तटकरे,कुणबी संघाचे माजी सरचिटणीस मधुकर तोरस्कर, उपाध्यक्ष बबन उंडरे, मा.सरचिटणीस अरविंद डाफळे, मा.भास्कर चव्हाण, गणेश मौले,अशोक करंजे, हरिश्चंद्र पाटील, गुहागरचे अध्यक्ष कृष्णाजी वणे, संभाजी काजरेकर, रोहा तालुका ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष सुरेश मगर, तळा पंचायत समितीच्या सभापती सौ.अक्षरा सचिन कदम, कुणबी कलामंच डायरेक्टर सुभाष गोताड, सौ.रुचिता बोलाडे हे विचारमंचावर उपस्थित होते.