रायगड प्रतिनिधी
सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी सावरसाई ग्रामपंचायत जवळ असलेल्या खडी क्रुशर व डांबर मशीन मधुन मोठ प्रमाणात प्रदूषण होत असुन लहान मुलाचा जीवाला धोका निर्माण होत आहे तसचे डांबर मशिन जवळ सीएनजी पंप आहे आणि हाय खुप धोकादायक असून यावर कारवाई होण्यासाठी पाठ-पुरावा करुन देखील कुठल्याही प्रकारची दाद मिळत नसल्यामुळे, आज दिनांक 14-03-2024 रोजी तहसिलदार अधिकारी याची भेट घेऊन उपोषणाचा अर्ज दाखल केला.
सदर पुढील १५ दिवसात 1) सुरू असलेले प्रदूषण थांबले पाहजे 2) सदर मशीन कायम स्वरूपी बंद झाल्या पाहेज 3) माहिती अधिकार माहिती मिळाली पाहिजे 4)सदरची माहिती लपवून कोणाला वाचवतात ग्रामसेविका यांनी सदरचा प्रकरणावर कोणतीही कारवाई का केली नाही माहिती का मिळत नाही याची सखोल चौकशी करून तात्कळ निलंबिनाची कारवाई करावी . अशी मागणी केली व तसे न झाल्यास मी ३ महिनाची ग्रभवती असुन माझ्या २ वर्षाचा मुला सोबत पेण तहसीलदार अधिकारी यांच्या दालनात आमरण उपोषणास बसणार असा ईशारा दिला.
सदर प्रकरणाची चाकौशी करून योग्यती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन तहसिलदार अधिकारी यांनी दिले.