December 2, 2024 Monday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

पेण तालुका मधील अवैध्य असलेल्या खडी क्रशर व डाबर प्लॅन्ट मधुन होण्याऱ्या प्रदुषणमुळे लहान मुलाच्या जीवाशी होतोय खेळ

पेण शहर प्रतिनिधी : रोहित शिंदे

अवैध्य असलेल्या खडी क्रशर व डाबर प्लॅन्ट मधुन होण्याऱ्या प्रदुषणमुळे लहान मुलाच्या जीवाशी होतोय खेळ निवेदन देऊन देखील सावरसाई ग्रामपंचायती मार्फ़त कारवाई करण्यास टाळाटाळ सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर 3 महिन्याच्या गरोदर असून त्या आपल्या २ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन तहासिलदार अधिकाराच्या दालनात आमरण उपोषण करणार

पेण तालुका मधील सावरसाई ग्रामपंचयात जवळ असलेल्या अवैध्य असलेल्या खडी क्रशर व डाबर प्लॅन्ट मुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत असून या विषयी पेणच्या सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी ३०/१२/२०२३ रोजी निवेदन व प्रदूषणाचे पुरावे दिले होते परंतु जानेवारी महिना पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही त्यानंतर वकीला मार्फत नोटिस देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचे उत्तर ग्रामपंचायतींनी दिलेले नाही. ०७/०२/२०२४ रोजी माहितिचा कायदा अर्ज दाखल करण्यात आला १ महिना उलटुन सुद्धा कुठलीच माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेली नाही. पेण प्रांत व पेण तहसील कार्यालत देखील माहिती अधिकार व तक्रार अर्ज दाखल करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही तसेच उत्तर हि देण्यात आलेले नाही. माहिती देण्यास टाळाटाळ का होते व हे कोणाचं आशिर्वादाने सुरू असा प्रश्न निर्माण झाला आहे.

१ एप्रिल २०२४ पासून सामाजिक कार्यकर्त्या अंकिता राजेंद्र सोंडकर 3 महिन्याच्या गरोदर असून त्या आपल्या २ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन तहासिलदार अधिकाराच्या दालनात आमरण उपोषण करणार व लवकरच मुंबई हायकोर्ट मध्ये याप्रकरणात मधील दोषी वर कारवाई होण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार आहे असेल प्रसार माध्यमाशी बोलताना सांगतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top