August 29, 2025 Friday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

पेण फौजदारी दिवाणी न्यायालयातील महासंचालक चिन्ह मिळालेले कोर्ट अँटनी पोलीस जितेंद्र म्हात्रे यांची पेण बार असोसिएशन यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक याकडे रिमांड कामासंदर्भात ठराविक अर्थिक हितसंबंध वकिलांना नेमण्यात हट्टहास बाबत तक्रार दाखल

प्रतिनिधी पेण :-

पेण फौजदारी व दिवाणी न्यायालय मध्ये पेण पोलीस ठाणे, वडखळ पोलीस ठाणे,दादर पोलीस ठाणे या मधील फौजदारी कामे येत असतात ही कामे येत असताना रिमांड बाबत तपासणी अंमलदार व कोर्टातील मध्यस्थ केंद्रातील पोलीस यांना पोलिस जितेंद्र म्हात्रे हे ठराविकच हितसंबंध वकिलांना नेमण्यात बाबत आरोपी व त्यांच्या नातेवाईकांना कळवले जात आहे तसेच आरोपी व नातेवाईक वर दबाव आणला जातो हाच वकील करा तरच बेल मिळेल दुसरा वकील केला तर तुला पोलिस कोठडी मारहाण केली जाईल तसेच केस देखील तुमच्या प्रमाणे चार्ज शीट तयार केली जाईल साक्षीदार तुमच्या प्रमाणे ठेवा तुम्हाला निर्दोष मुक्तता केली जाईल मी सुचवलेला वकील केला तर तुम्हाला बेल मिळेल नाहीतर तुला शिक्षा देण्यात येईल अशा प्रकार पेण कोर्टातील कोर्ट आर्टनी पोलिस जितेंद्र म्हात्रे करत आहे
सुमारे गेली १० वर्ष पेक्षा पेण न्यायलयात कोर्ट अँटनी म्हणून जितेंद्र म्हात्रे हे कार्यरत आहे यापूर्वी देखील १० वर्ष पेण कोर्ट मध्ये कार्यरत होते त्यांना पोलिस महासंचालक पद देखील मिळाले आहे सदर पोलिस खात्यात पदाचा गैरवापर करत आर्थिक हितसंबंध असलेलं १ ते २ वकील चे वकीलपत्र पोलीस ठाण्यात जाऊन वकील पत्रा सह्या आणणे एकाच वकील व त्यांचे ज्युनिअर रिमांड कामे आर्थिक हितसंबंध असलेले वकीलाना चालविण्यास देणे ४१अ प्रमाणे नोटीस दिलेले केस मध्ये लागे संबंध असलेले वकील सुचवणे, रिटर्न ऑफ प्राॅपटी कामे देणे असे प्रकार पोलिस जितेंद्र म्हात्रे करत आहे या संदर्भात पेण बार असोसिएशन यांनी ठराव घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड, उपविभागीय अधिकारी पेण याकडे तक्रार दाखल करून यांवर कारवाई करत बदली करण्यात यावी याबाबत तक्रार दाखल केली आहे.


पोलीस जितेंद्र म्हात्रे यांच्या मुळे सर्व सामान्य नागरिकांचा न्यायालयातील रिमांड कामाबाबत व न्यालयावरचा विश्वास उडाला आहे.


याबाबत लवकरच पेण बार असोसिएशन व वकील याबाबत तक्रार पोलीस महासंचालक व महाधिवक्ता सरकारी वकील कार्यालय मुंबई ,राज्य पोलीस तक्रार निवारण आयोग येथे दाखल करणार आहे कायदा व सुव्यवस्था पोलीस जितेंद्र म्हात्रे हा अर्थिक हितसंबंध असलेले वकील कमकुवत करत असल्याचे कळले जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top