August 30, 2025 Saturday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाचा भ्रष्टाचार

प्रतिनिधी : रायगड

गट विकास अधिकारी पेण यांना सामाजिक कार्यकर्ते दामोदर जेधे ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाचा भ्रष्टाचार तक्रार अर्ज नुसार लवकात दखल घेण्यात निवेदन देऊन कोर्ट कारवाई इशारा दिला

पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते दामोदर जेधे यांनी माहिती अधिकार मधून मिळाली असता सन२०१६ पासून आजपर्यंत ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगरचे ग्राम पंचायत अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजना भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आला आहे.


सदर लाभार्थ्यांना लाभ दिला आहे त्या लाभार्थ्यांची लाभ घेण्यापूर्वी पक्का स्वरूपात घरे असताना असेसमेंट पक्के घर नोंदी असताना ग्रामपंचायत अधिकारी यांनी आवास योजना लाभ दिला आहे सदर लाभार्थ्यांनी अधिकारी यांच्याशी संगनमत करून जुन्या घरांना रंगरंगोटी किरकोळ दुरुस्ती करून नवीन घरे बांधली आहे असे भासवून फोटो काढून आवास योजना घरकुल पूर्ण केले शेरे ग्रामपंचायत अधिकारी यांनी अर्थिक फायदा केला आहे.


शासन निर्णय प्रमाणे घरकुल बांधकाम करताना उप अभियंता याकडून बांधकाम पर्यवेक्षण केलेलें नाही
लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना पैसे बँकेत जमा झाल्यावर सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी खाण्यातून पैसे काढून संगनमत करून वाटून घेतले आहे एकाच व्यक्तीला दरवर्षी लाभ दिलेले आहे.


तरी प्रधानमंत्री आवास योजनातील सन २०१६ ते आजपर्यंत मंजूर प्रकरणात सखोल चौकशी करून सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांवर गुन्हे दाखल करता दामोदर जेधे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती रायगड, जिल्हा पोलिस अधीक्षक रायगड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) याकडे ठोस पुरावे सहित तक्रार दाखल केली होती तरी सदर प्रधानमंत्री आवास योजनातील लवकरच दोषी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी महलमिऱ्या यावर गुन्हे दाखल करण्या करता पेण गट विकास अधिकारी पेण यांना सामाजिक कार्यकर्ते दामोदर जेधे ग्रुप ग्रामपंचायत महलमिऱ्या डोंगर मधील प्रधानमंत्री आवास योजनाचा भ्रष्टाचारची तक्रार अर्ज नुसार लवकात दखल घेण्यात यावी याबाबत निवेदन देऊन कोर्ट कारवाई इशारा दिला.

तरी प्रधानमंत्री आवास योजनाची भक्कम पुरावे देऊन सुद्धा सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी महलमिऱ्या यावर गुन्हे दाखल न झाल्यास कोर्ट मार्फत ३०दिवसात केस दाखल करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात येईल (ॲड.नागेश जगताप).

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top