November 15, 2024 Friday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

भ्रष्टाचाराला आळा, संविधान कायदेसंरक्षण व आरटीआय कार्यकर्त्यांना संरक्षण व न्याय मिळवून देण्यासाठी माहिती अधिकार व मानव अधिकार कार्यकर्ते यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केले निवेदन

मुंबई प्रतिनिधी :-

आरटीआय म्हणजे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केलेलं काम म्हणजे ऐक प्रकारे देश सेवा राज्य सेवा मी समजतो आमचा हाच उद्देश असतो की सामान्य नागरिक भ्रष्टाचाराला बळी न पडता सामान्य नागरिकांची कामे झाली पाहिजेत हाच उद्देश पण हे करत असताना राजकीय नेते, शासकीय अधिकारी, भ्रष्टाचार केल्या शिवाय काम करायलाच तयार नाही, मग अश्या वेळी आम्ही आरटीआय टाकून याचं जनतेसमोर भ्रष्टाचाराच पितळ उघडं पडण्याचा प्रयत्न केला तर आरटीआय पदाधिकारी यांना धमक्या देणे जिवे मारण्याची धमकी देऊन काही वेळेस जिवे मारलही जात अश्या गोष्टी घडत आहेत.

मग अस झालं तर आम्हा आरटीआय बांधवांना न्याय मिळत नाही आणि न्याय मिळवण्यासाठी पुढे सरसावलो तर पाठबळ मिळत नाही आणि अधिकारी वर्ग ही आमची अवहेलना करून प्रकरण दाबून आमचा आवाज कायमचा बंद करतात आपण आरटीआय वाले आपला जीव धोक्यात घालून हा देश भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न करत असताना आम्हाला न्याय मिळत नाही . यावरती काय करावं हा प्रश्न मनाला सतत भेडसावत होता मग मनामधे संकल्पना आली की या विषयी कोणाकडे तरी चर्चा करावी आणि हा विषय कसा मार्गी लावावा यासाठी आरटीआय ह्युमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे एक्टिविस्ट श्री. सचिन बापू खरात (मुंबई) त्यांचे सहकारी मा. श्री. राजेश माकोडे (पुणे) व  आरटीआय ह्युमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे इतर पदाधिकारी  यांना घेऊन   संकल्पना तयार करण्यात आली जेणेकरून आरटीआय पदाधिकारी याचेवर होणारे हल्ले, अधिकारी वर्गाकडून योग्य न्याय मिळत नाही या गोष्टींना कुठे तरी आळा बसला पाहिजे.

त्यासाठी महिती अधिकार अधिनियम हा एक आधार आहे. आणि काळाच्या गरेनुसार माहिती अधिकार अधिनियम याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्या आम्हीं आमचे सहकारी ऍडव्होकेट विजय दानेज सर यांच्याशी चर्चा केली. पुढचे पाऊल उचलण्यासाठी व भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी वरिष्ठ राज्य पोलिस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्याकडे नियंत्रणासाठी दाद मागण्यासाठी दिनांक १५/७/२०२४ रोजी यांना आमचे सहकारी फयीम खान (नवी मुंबई) श्री. रवींद्र रामचंद्रराव जाधव (हवेली, पुणे) गणेश थोरात (सातारा) शंतनु बिस्वास (अंधेरी) सोबत पत्रकार संपादक सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्वांनी पाठींबा दिला व संपूर्ण नियोजनाला हातभार लावला व निवेदन पत्र श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या कार्यालयात देऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top