रायगड प्रतिनिधी :
सामाजिक कार्यकर्ती अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी सावरसाई ग्रामपंचायत जवळ असलेल्या खडी क्रुशर व डांबर मशीन मधुन मोठ प्रमाणात प्रदूषण होत जवळ असलेल्या नदीचे पाणी मोठा प्रमाणात दूषित होत आहे डांबर मशीन जवळ शासकीय शाळा आहे प्रदूषणा मुळे लहान मुलाचा जीवाला धोका निर्माण होत आहे.
तसचे डांबर मशिन जवळ सीएनजी पंप आहे आणि उच्च तापमान मुळे सीएनजी पंप धोका निर्माण होऊ शकतो ही बाब गंबीर असून ही बाब तहसिल अधिकारी व ग्रामसेविका यास निर्दर्शास आणुन यावर कारवाई होण्यासाठी वारमवार पाठ-पुरावा करुन देखील कुठल्याही प्रकारची दाद मिळत नसल्यामुळे १४ एप्रिल २०२४ रोजी 1. ग्रामपंचायत सावरसाई ग्रामसेविका 2. गटविकास अधिकारी पेण रायगड 3. तहसिलदार अधिकारी पेण 4. प्रांत अधिकारी पेण 5. जिल्हाधिकारी अलिबाग – रायगड6. महाराष्ट्र प्रदुषण मंडळ अधिकारी ( SRO २ रायगड ) 7. महानगर गॅस अधिकारी याना वकील मार्फत नोटिस देण्यात आली पुढील ३० दिवसात दखल घेऊन योग्य ती कारवाई न झाल्यास संबाधित अधिकारी वर्गाना विरुद्ध पक्षकार मध्ये समाविष्ठ करुन माननीय न्यायालयात जनहितयाचिका दाखल करणार असे सांगतले