January 2, 2025 Thursday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर ग्रभवती महिला १२ एप्रिल २०२४ पासुन करणाऱ्या आमरण उपोषणासाठीची परवानगी पोलीसा कडुन नाकारण्यात आली.

सामाजिक कार्यकात अंकिता राजेंद्र सोंडकर यांनी  सावरसाई ग्रामपंचायत जवळ असलेल्या खडी क्रुशर व डांबर मशीन मधुन मोठ प्रमाणात प्रदूषण होत जवळ असलेल्या नदीचे पाणी मोठा प्रमाणात दूषित होत आहे डांबर मशीन जवळ शासकीय शाळा आहे प्रदूषणा मुळे लहान मुलाचा जीवाला धोका निर्माण होत आहे तसचे डांबर मशिन जवळ सीएनजी पंप आहे  आणि उच्च तापमान मुळे सीएनजी पंप धोका निर्माण होऊ शकतो ही बाब गंबीर असून ही बाब तहसिल अधिकारी व ग्रामसेविका यास निर्दर्शास आणुन यावर कारवाई होण्यासाठी वरमवार पाठ-पुरावा करुन देखील कुठल्याही प्रकारची दाद मिळत नसल्यामुळे  दिनांक २८/०४/२०२४  रोजी  तहसिलदार अधिकारी व पोलिस निरीक्षक याची भेट घेऊन उपोषणाचा अर्ज दाखल केला.

पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार पुराव्या सोबत जनते समोर आणुन देखील तहसील व इतर संबंधित सहबागी अन्य अधिकारी कश्या प्रकारे कारवाई साठी टाळाटाळा कश्या प्रकारे करत आहे हे जनतेसमोर आणले.

1) सुरू असलेले प्रदूषण थांबले पाहिजे  2) सदर मशीन कायम स्वरूपी बंद झाल्या पाहेज 3) ग्रामसेविका व तहसीलदार यांनी सदरचा प्रकरणावर कोणतीही कारवाई का केली नाही याची सखोल चौकशी करून तत्काळ निलंबिनाची कारवाई करावी . अशी मागणी केली व तसे न झाल्यास मी ३ महिनाची ग्रभवती  असुन माझ्या  २ वर्षाचा मुला सोबत पेण तहसीलदार अधिकारी यांच्या दालनात आमरण उपोषणास बसणार असा ईशारा दिला होता

दिनाक ११/०४/२०२४ रोजी आचारसहिता सुरू असताना उपोषण करू शकत नाही व तसे केल्यास कायदेशीर कारवाई करावी लागेल असे पोलिसा मार्फत पत्र देण्यात आले ,त्यामुळे तूर्तास उपोषण स्थगित केले असे सांगतले तसचे न्यायालीन प्रक्रिया सुरू असून लवकरच जनहित याचिका दाखल करणार आणि सर्व दोषी वर कारवाई झाल्या शीवाय शांत बसणार नाही व आचारसहिता संपल्याच्या दुसऱ्या दिवशी तहसीलदार दालनात उपोषण करणार असे सांगतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top