November 29, 2024 Friday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

Divide in ST employees' strike .. Employees start working in this district

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट..? या जिल्ह्यात कर्मचारी कामावर रुजू

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. हा संप मोडण्याची तयारी एसटी महामंडळाकडून सुरु आहे.

अलिबाग, रायगड : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. हा संप मोडण्याची तयारी एसटी महामंडळाकडून सुरु आहे. नवीन 2500 उमेदवारांना कामावर रुजू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. महाड एसटी डेपोत कंट्रोलर, सफाई कर्मचारी कामावर परतले आहे. मान्य झालेल्या मागण्यांमुळे कर्मचारी समाधानी आहेत. कर्मचारी कामावर रुजू झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट, पडल्याची चर्चा सुरु झाली आहे.
 
संप चिरडणार.?, सरकार 2500 नव्या उमेदवारांना तातडीने करणार रुजू
राज्यभर एसटीच्या कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरु असताना रायगडच्या महाडमध्ये मात्र एसटीचे कर्मचारी कामावर परतले आहेत. काल संध्याकाळपासुन कंट्रोलर तर आज सकाळपासुन सफाई कामगार कामावर हजर झालेत. मान्य झालेल्या मागण्यांवर समाधानी असल्याचे या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नाशिक आणि पुण्यात शिवशाही आणि शिवनेरी या बस सोडण्यात आल्या होत्या. सकाळी निघालेली शिवशाही बस पुण्यात पोहोचल्यानंतर इतर खासगी शिवशाही सोडण्यात येणार असल्याची एसटी प्रशासनाची माहिती दिली. मुंबईला ही बस सोडल्या गेल्या आहेत.
 
सांगलीत खासगी शिवशाही बस सुरू
पुणे, नाशिकनंतर सांगलीत खासगी शिवशाही बस सुरू करण्यात आल्या आहेत. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना बस स्थानाकासमोरून हटवले गेले आहे. सकाळी सांगली ते पुणे शिवशाही बस झाली रवाना झाली. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी बस स्थानकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आहे.
 
दरम्यान, खासगी शिवशाही सुरू करून आंदोलन चिरडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून कोणताही एसटीचा कर्मचारी कामावर रुजू झालेला नाही. आमचा संप सुरूच असल्याचं आंदोलक कर्मचाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top