कोकणातील या सहा प्रकल्पांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
कोकणातील सहा सिंचन प्रकल्पांच्या निविदा स्थगितीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. कोकण : कोकणातील सहा सिंचन प्रकल्पांच्या निविदा स्थगितीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. तसा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कोकण विभागातील सहा प्रकल्पांमधील यापूर्वीचे निविदा विखंडनाचे आदेश रद्द करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली