कुणबी समाजोन्नती संघ संलग्न कुणबी युवा मुंबई आयोजित दिवाळी ‘बळी पहाट’ कार्यक्रम दामोदर हॉल, मुंबई येथे संपन्न झाला.
कुणबी समाजोन्नती संघ संलग्न कुणबी युवा मुंबई आयोजित ‘बळी पहाट – शोध इतिहासाचा,सत्य सांस्कृतीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन दामोदर हॉल,मुंबई येथे करण्यात आले होते.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्यावतीने समाजाला संघटीत व जागृत करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.कोकणातील आणि राज्यातील ओबीसी कुणबी समाजाला संविधानाने दिलेल्या हक्क अधिकारासाठी जागृत करण्याचे कार्य गेली १०१ वर्ष हि मातृसंस्था करीत आली आहे.सर्व समाजाला पूरक असे काम या सामाजिक संस्थेचे नेहमीच राहिले आहे.