December 20, 2024 Friday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

महाराष्ट्र राज्य मानवाधिकारी आयोगाचा शिक्षकां विषयी महत्वपूर्ण निर्णय

प्रतिनिधी – विजय वाघ

अकोला – सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा, अकोला येथील शिक्षक गालीब शेख दुर्रानी यांनी महिला शिक्षिकांना दिलेल्या त्रासाच्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आयोगाने महिला शिक्षिकांना मोबदला देण्याचे आदेश जारी केले आहेत.

महिला शिक्षिकांनी केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शिक्षकांकडून वारंवार मानसिक छळ, अवहेलना आणि कामाच्या ठिकाणी असह्य वातावरण तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या संदर्भात चौकशी प्रक्रिया सुरुवातीला अयोग्य पद्धतीने हाताळण्यात आली होती, यावर आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आयोगाच्या आदेशानुसार,

  1. महिला शिक्षिकांना झालेल्या त्रासाबद्दल योग्य तो मोबदला देण्यात यावा.
  2. चौकशी प्रक्रियेमध्ये दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
  3. शिक्षण विभागाने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कार्यक्षम तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करावी.
    महिला शिक्षिकांनी आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, हा न्याय मिळाल्याचा दिलासा व्यक्त केला आहे. शिक्षण क्षेत्रात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे आयोगाच्या आदेशाने संपूर्ण शिक्षण विभागाला कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

आयोगाचा आदेश शिक्षण विभागासाठी एक महत्त्वाचा सन्देश ठरला असून, कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरण मिळणे अनिवार्य आहे.
आयोगाच्या आदेशानुसार महिलांना मोबदला देण्याचा निर्णय तसेच दोषींवर शिस्तभंगाची कारवाई होणार शिक्षण विभागात कार्यक्षमता सुधारण्याची गरज अधोरेखित या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात महिलांच्या हक्कांचे रक्षण होण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top