November 16, 2024 Saturday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

सामाजिक कार्यकर्त्या अंकिता सोंडकर यांच्या बद्दल खोटा अर्ज दाखल करणाऱ्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखला करण्यात आला.

रायगड प्रतिनिधी :

मागील काही महिन्या पासुन सामाजिक कार्यकर्त्या अंकिता सोंडकर या सावरसई हद्दी मध्ये सुरु असलेल्या अनाधिकृत डांबर प्लॅंट विरुद्ध आक्रमक भूमिका घेत घातक प्रदूषण होणारा अनाधिकृत डांबर प्लॅंट बंद करण्यासाठी सबंधीत शासकीय विभाग यांना पुराव्या सोबत पत्र व्यवहार करत होत्या परंतु कोणतीही दाद मिळत नसल्यामुळे उपोषण करणार असुन , न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यासाठी तयारी करत आहेत , ही बाब समजतास अंकिता सोंडकर यांना थांबवण्यासाठी सावरसई हद्दी मधील जवळपास ८० लोकांच्या खोट्या सह्यांचा तक्रार अर्ज पेण पोलिस ठाण्यात दाखल केला.

सदर अर्जामध्ये खोटे आरोप करत अंकिता सोंडकर व त्यांच्या पतीचे देखिल नाव टाकण्यात आले होते . सदर अर्जावर ८० लोकांच्या सह्या व जबाव मात्र ३ लोकांचे नोंदव्यात आले होते
सदर खोटा अर्ज दाखल करुन जबाब देणारे १) योगेश सीताराम दिवेकर २) प्रकाश पांडुरंग पडवळ ३) नरेश काशिनाथ चिंबोरे याच्या विरुद्ध आज दि ३०/०८/२०२४ रोजी माननीय न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.

अनाधिकृत डांबर प्लॅंट विरुद्ध जनहितयाचिकेच्या कागद पत्राची प्रक्रिया ही पूर्ण झाली असुन २० सप्टेंबर पर्यत जनहित याचिका देखील दाखल होईल असे सांगितले .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top