January 7, 2026 Wednesday

kokan times

The Voice Of Kokan

The Voice Of Kokan

आदर्श गाव संकल्पनेसाठी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची भेट

खामखेड–राहेरा गावाच्या विकासावर सखोल चर्चा

प्रतिनिधी मुंबई

महाराष्ट्रात सामाजिक व प्रशासकीय कार्यासाठी गाजलेले ज्येष्ठ व अनुभवी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची सामाजिक कार्यकर्ता सुमित भाऊ माकोडे व अनंत शेळके, जिल्हाध्यक्ष – ह्युमन राइट्स अ‍ॅक्टिविस्ट असोसिएशन ग्रुप, बुलढाणा यांनी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान खामखेड–राहेरा या गावाच्या सर्वांगीण विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

गाव कसे आदर्श करता येईल, कोणकोणत्या शासकीय योजना गावात आणता येतील, स्वच्छता, सौंदर्यीकरण, लाईट व्यवस्था, RO पाणी, रस्ते व मूलभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील यावर सकारात्मक व मार्गदर्शक चर्चा झाली.

या चर्चेदरम्यान सामाजिक कार्यकर्ता सुमित माकोडे व अनंत शेळके यांनी गावविकासासंदर्भातील आपले विचार मांडले. अनुभवी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्यासोबत झालेली लाईव्ह मुलाखत अत्यंत प्रेरणादायी ठरली.

त्यांनी पुढील सामाजिक व विकासात्मक वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे, सरपंच पदाची निवडणूक झाल्यानंतर खामखेड–राहेरा गावाला भेट देण्याचा शब्द भास्करराव पेरे पाटील यांनी दिला असून, त्याबद्दल उपस्थित सर्वांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

ही भेट गावविकासाच्या दृष्टीने निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Kokan Times

error: Content is protected !!
Scroll to Top