शिरूर प्रतिनिधी : भरत चव्हाण
शिक्रापूर ता. शिरुर येथे पुणे अहिल्यानगर महामार्गावर गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओ जप्त करण्यात आल्या असून त्याच्यातून ५३ किलो गांजा सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
वैष्णव वैजनाथ ढाकणे (वय २३ वर्षे रा. हासनपूर ता. शेवगाव जि. अहिल्यानगर), स्वप्नील गोरक्षनाथ खेडकर (वय २२ वर्षे) व हर्षद देविदास खेडकर (वय २० वर्षे दोघे रा. एकनाथवाडी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर), शुभम बंडू जवरे (वय २१ वर्षे )व तुषार रामनाथ जवरे (वय २१ वर्षे दोघे रा. वाडगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर), अक्षय कांतीलाल आव्हाड (वय २६ वर्षे रा. करमाळा रोड राशीन ता. कर्जत जि. अहिल्यानगर) यांना अटक कऱण्यात आली असून यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस हवालदार मिलिंद देवरे शिक्रापूर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे नगर महामार्गावरून दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून काही युवक गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना मिळाली, त्यांनतर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पुणे नगर रस्त्यावर सापळा लावला असता त्यांना दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ आल्याचे दिसून आले, यावेळी पोलिसांनी दोन्ही स्कॉर्पिओमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचे दिसून आले, दरम्यान पोलिसांच्या पथकाने दोन्ही स्कॉर्पिओ सह त्यामध्ये असलेला तब्बल त्रेपन्न किलो गांजा जप्त करत सहा युवकांना ताब्यात घेत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.