टाइम्स :
फलटण एज्युकेशनचे तरडफ प्राथमिक व माध्यमिक हायस्कुलच्या १९९३ ची इयत्ता १० वी च्या बॅचच्या ३५ माझी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर एक नाही दोन नाही तब्बल 3१ वर्षानंतर मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. या मेळाव्यात शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय माजी विद्यार्थ्यांनी घेतला.
करिअरच्या मागे धावत असताना बॅचमधील मित्र- मैत्रिणींना भेटणं तर दूरच पण बोलणंही नव्हतं. गेट टुगेदर वेळीं शिक्षक वर्ग व विद्यार्थी एकत्र पाहून असं वाटलं की
आमच्या मैत्रीचा पुर्नजन्म घडवला.
गेट-टुगेदर ची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मूर्तीला दीपप्रज्वलन करून देशपांडे मॅडम आणि कराळे गुरुजी यांच्या प्रार्थनेने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली शिंदे (स्वागत गीत गाऊन ) आणि संतोष शेडगे यांनी हाती घेतले.
मेळाव्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी स्व-परिचय देऊन मनोगत व्यक्त करतांना विशेष प्रवीणने, आणि शैलेश यांनी सर्वांना दिलखुलास हसवलं. नंतर कोणी लाजत लाजत तर कोणी मनमोकळे पणानं व्यक्त होत होते. एकमेकांच्या व्यवसाय नोकरीची देवाण घेवाण झाली तसेच बोलता बोलता थट्टा मस्करीही होत होती. तसेच सर्वांनीच शालेय जीवनातील गमतीजमती सांगितल्या. वयाच्या पन्नाशीकडे वाटचाल करणाऱ्या आपण सर्वांनी आध्यात्मताकडे थोड तरी वळल पाहिजे तसेच प्राण्यांची सर्वांनी काळजी घ्यावी म्हणजे निसर्गाचा समतोल राखला जाईल
असा मोलाचा विचार आमची मैत्रीण स्वाती शिंदे हिने मांडला. तसेच वेळेचे गांभीर्य आणि संगत याबाबत महेंद्र शिंदे यांनी विचार मांडले नंतर मीना सावंत यांनी येणाऱ्या काळात शेतीला खुप महत्त्व असेल शेती व्यवसायाला प्राधान्य द्यावें असे पटवून दिले.
शिक्षकांनी सुध्दा त्यावेळचे विद्यार्थी व सध्याचे विद्यार्थी व आलेले अनुभव आपल्या मनोगतातुन व्यक्त केले. सर्व माजी विद्यार्थी व शिक्षक यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत जीवन जगत असतांना असे मेळावे होण्याची गरज आहे हे पटवून दिले. मेळाव्याचे मुख्य आकर्षण कराळे गुरुजी व विजय थोरात गुरुजी हे होते. कराळे गुरुजी यांनी शिकवलेला गणित विषय व त्यामुळे विद्यार्थ्यांचे घडलेले करियर या विषयी खूप चर्चा झाली . थोरात गुरुजी यांच्या वक्तृत्व गुणाविषयी विद्यार्थ्यांनी खूप कौतुक केले. महाविद्यालयातील भुजबळ सर, जाधव सर, धायगुडे सर, किसन जाधव आणि भिसे मॅडम यांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. व त्यांच्या करिअरची सुरुवात ९३ च्या बॅचपासून तरडफ या गावातून झाली असे सांगून इतक्या वर्षांनी पुन्हा भेटताना खुप आनंद झाला असे सांगितले. आणि त्यावेळेस कुमार शिंदे हे शाळेला शिपाई म्हणून लाभले होते.
स्वाती गोडसे यांच्या संकल्पनेतून भारतीय लोकांनी पाश्च्यात्य संस्कृती स्विकारल्यामुळे लोकांच्या सुविधेसाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्यामुळे निसर्गाची अपरिमित हानी झाली आहे. निसर्गाचा समतोल बिघडल्याने काही भागात पाऊस सरासरी पेक्षा कमी पडतो. निसर्गाची हानी काही प्रमाणात कमी करण्याच्यादृष्टीने आम्ही वृक्षारोपण करण्याचे ठरवून शिक्षकांना वृक्ष रोपे भेट म्हणून दिले.
आपण सर्वांनी गेट-टुगेदर निमित्ताने एक छोटस रोपटे लावलेल आहे .या रोपट्याचे रूपांतर एका विशाल वृक्षामध्ये करायची तळमळ आहे . यामुळे आपण सर्वजण एकत्रित येऊन कितीही मोठया संकटाला मात करू शकू. असे बाळासाहेब जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले.
गेट-टुगेदर कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी
स्वाती गोडसे , स्वाती शिंदे , मीना सावंत , वंदना सावंत ,मंदा सावंत , सविता मदने, वैशाली शिंदे , वैशाली खरात, शोभा भंडलकर , बाळूताई शिंदे ,शालणं गोडसे , वनिता गोडसे , अनिता मदने , प्रमिला सपकळ.
संतोष शेडगे , सचिन खरात, जितेंद्र ढवळे, चंद्रकांत मदने, महेंद्र गोडसे, महेंद्र शिंदे, प्रवीण पवार, दादा पवार, शैलेश जगताप, बाळासाहेब जाधव, आप्पासो ढेंबरे , सतीश सपकाळ, संजय गोडसे आणि इतर मंडळी यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे यशस्वीरित्या पार पडला.
शेवटी स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
सुंदर फोटोग्राफी आणि स्पीकर माईक सहकार्य अनिकेत सचिन खरात यांनी केले.
उत्तम जेवण व्यवस्था जितेंद्र ढवळे, चंद्रकांत मदने, दादासाहेब पवार, सुदाम मदने आणि महेश गोडसे यांनी यशस्वी रित्या पार पाडली. सर्व शिक्षक नियोजन निमंत्रण महेंद्र शिंदे यांनी केले.
फेटे बांधणी प्रवीण माने यांनी केली त्यांचे खुप आभार.