रायगडच्या समुद्रकिनारी पर्यटकांची दिवाळी
अलिबाग – बहुसंख्य कार्यालयांना रविवारपर्यंत सलग चार दिवस सुट्टी आहे. यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी हजारो पर्यटकांनी गुरुवारी सकाळपासून अलिबागसह जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांना पसंती दिली आहे. काही पर्यटकांनी माथेरानसह किल्ल्यांकडे मोर्चा वळवला. कोरोना संसर्ग कमी होत असताना पर्यटकांची जिल्ह्यात वाढती गर्दी व्यावसायिकांसाठी सुखावणारी ठरली.